सिनेसृष्टीतील काही कलाकार नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. यातच आता सिनेसृष्टीत खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीने दोन खून केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक देखील करण्यात आली आहे. आलिया असे नर्गिस फाखरीच्या बहिणेचे नाव असून तिच्यावर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची नवी गर्लफ्रेंड या दोघांचाही खून केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री नर्गिसची बहीण आलिया फाखरी 43 वर्षांची आहे. आलियावर खुनाचा आरोप आहे आणि त्यामुळे ती चर्चेत आहे. तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची नवी गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपाखाली क्वीन्स, न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली आहे. आलियाने मत्सरातून दोन मजली गॅरेजला आग लावली अशी माहिती समोर आली आहे. ही घडना घडली तेव्हा 35 वर्षीय एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया 'स्टार' एटीन त्या गॅरेजमध्ये उपस्थित होते. आग भडकल्यानंतर त्या दोघांनाही गॅरेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हि आग अभिनेत्री नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिने लावली असल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत अभिनेत्री नर्गिस फाखरीने बोलणे टाळले आहे.