Tuesday, December 10, 2024 11:35:33 AM

NCP vs Pawar NCP
इंदापूरमध्ये पवारांची राष्ट्रवादी फुटली ?

जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही. जगदाळे यांच्या या निर्णयामुळे इंदापुरात शरद पवारांचा पक्ष फुटण्याचा धोका हर्षवर्धन पाटील यांना आहे.

इंदापूरमध्ये पवारांची राष्ट्रवादी फुटली
manunile
manojteli

नवनाथ बोरकर बारामती : शरद पवारांचा दौरा होताच राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब जगदाळें यांनी इंदापूरात आपली भूमिका जाहीर केलेली आहे. नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळेंनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिला असून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत जगदाळेंनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर इंदापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही, असा इशारा दिला आहे. 


जगदाळेंनी शरद पवार- सुप्रिया सुळे यांच्यावर साधला निशाणा 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नाराज असलेले इंदापूरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आज मोठा राजकीय निर्णय घेतला. जगदाळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. ते अजित पवारांच्या नेतृत्वात दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करणार आहेत. जगदाळे यांनी हा निर्णय घेतला आहे की, जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही. जगदाळे यांच्या या निर्णयामुळे इंदापुरात शरद पवारांचा पक्ष फुटण्याचा धोका हर्षवर्धन पाटील यांना आहे. शरद पवारांनी इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आप्पासाहेब जगदाळे व बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांना वगळता इतर नाराज पाटील समर्थकांची भेट घेतली होती. पाटील यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले होते.त्यांच्या दौऱ्यानंतर जगदाळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo