Indian Rupees Value in Iran : जागतिक राजकारणात सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे मोठी खळबळ माजली आहे. युद्धाच्या या धगधगत्या आगीत इराणची अर्थव्यवस्था आणि तिथल्या चलनाचे मूल्य कमालीचे घसरले आहे. अनेक भारतीयांना प्रश्न पडतो की, आपल्या देशातील 100 रुपयांचे मूल्य इराणमध्ये नक्की किती असेल? सद्यस्थिती पाहता, भारतीय रुपया इराणमध्ये प्रचंड शक्तिशाली ठरत असून तिथल्या चलनाची आकडेवारी पाहून कोणीही थक्क होईल.
भारतीय रुपया आणि इराणी रियालची तुलना
इराणवर असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध आणि सध्या सुरू असलेले भीषण युद्ध यामुळे इराणचे अधिकृत चलन 'इराणी रियाल' (Iranian Rial) अत्यंत कमकुवत झाले आहे. फेब्रुवारी 2026 च्या ताज्या विनिमय दरानुसार, 1 भारतीय रुपया म्हणजे सुमारे 14,434 इराणी रियाल होतात. या हिशोबाने जर तुमच्याकडे भारताचे केवळ 100 रुपये असतील, तर इराणमध्ये त्याचे मूल्य तब्बल 14,43,429 (सुमारे 14 लाख 43 हजार) इराणी रियाल इतके होते.
भारताच्या 100 रुपयांत इराणमध्ये काय मिळेल?
इराणमध्ये चलनाचे मूल्य कमी असले तरी महागाईमुळे वस्तूंच्या किमती लाखांच्या घरात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य जनता हालाखीचे आयुष्य जगत आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत तिथल्या काही जीवनावश्यक वस्तूंचे दर खालीलप्रमाणे आहेत:
1 लिटर दूध: 5,00,000 रियाल (भारतीय चलनात सुमारे 35 रुपये)
1 डझन अंडी: 7,00,000 ते 8,00,000 रियाल (सुमारे 50-55 रुपये)
1 पाव (Bread): 1,50,000 रियाल (सुमारे 10-12 रुपये)
1 लिटर पेट्रोल: 1,00,000 रियाल - सबसिडीसह (सुमारे 7-8 रुपये)
रेस्टॉरंटमधील जेवण: 10,00,000 ते 12,00,000 रियाल (सुमारे 70-85 रुपये)
हेही वाचा - Ayatollah Alireza Arafi : खामेनींचा मुलगा-नातवाची चर्चा मात्र इराणच्या सत्तेची सूत्रं अयातुल्ला अलिरेझा अराफी यांच्या हाती; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अराफींची नियुक्ती
चलनाच्या घसरणीची मुख्य कारणे
इराणी रियाल एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळण्यामागे 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेले युद्ध हे प्रमुख कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या "मेजर कॉम्बॅट ऑपरेशन्स" मुळे इराणच्या अणू प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून असलेले निर्बंध, वाढती महागाई आणि युद्धामुळे गुंतवणूकदारांचा उडालेला विश्वास यामुळे इराणमध्ये चलनी नोटांची संख्या मोठी असूनही त्यांचे मूल्य मात्र कवडीमोल झाले आहे.
पर्यकांसाठी आणि भारतीयांसाठी सतर्कतेचा इशारा
भारतीय रुपया तिथे मौल्यवान वाटत असला, तरी सध्याची युद्धजन्य परिस्थिती पर्यटनासाठी अत्यंत धोकादायक आहे. भारतीय दूतावासाने इराणमध्ये असलेल्या आणि तिथे जाण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. जोपर्यंत युद्धाच्या ज्वाळा शांत होत नाहीत, तोपर्यंत तिथली अर्थव्यवस्था आणि जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता धूसर आहे.
हेही वाचा - Iran Israel War: तेहरान हादरले; इस्रायलने हल्ला करून खामेनेईंपाठोपाठ 'या' मोठ्या नेत्यालाही संपवलं, मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका सुरूच