Wednesday, November 12, 2025 07:41:11 PM

राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ अर्ज दाखल

राज्यात सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ अर्ज दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यात २९ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्यासाठीचा अंतिम दिवस होता. यामुळे राज्यभरात अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची मोठी गर्दी होती. राज्यात २८८ जागांसाठी   निवडणुकीकरिता मंगळवारी २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. यानंतर राज्यातील लढती ठरणार आहेत.


सम्बन्धित सामग्री