जिरीबाम : मणिपूरमधील जिरीबाममध्ये सीआरपीएफने (Central Reserve Police Force / केंद्रीय राखीव पोलीस दल) केलेल्या कारवाईत ११ कुकी अतिरेकी ठार झाले. अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या कारवाईत कांगपोकपी जिल्ह्यातील एस चौनगौबांग आणि माओहिंग यांच्या संयुक्त पथकाने एक ५.५६ मिमी इन्सास रायफल, एक पॉइंट ३०३ रायफल, दोन एसबीबीएल बंदुका, दोन ०.२२ पिस्तूल, दोन सुधारित प्रोजेक्टाइल लॉन्चर, आणि दारुगोळा केला.
मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून मैतेयी आणि कुकी या समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार सुरू झाल्यापासून मणिपूरमध्ये तणावाची स्थिती आहे. या वातावरणात कुकी अतिरेक्यांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्यावर आणि जवळच असलेल्या सीआरपीएफच्या तळावर हल्ला केला तसेच आसपासच्या घरांना आणि दुकानांना आग लावली. यानंतर सीआरपीएफने केलेल्या कारवाईत ११ कुकी अतिरेकी ठार झाले.