Tuesday, May 20, 2025 04:19:08 PM

17 डॉक्टर अपयशी, शेवटी AI ने वाचवले 4 वर्षांच्या मुलाचे प्राण! ChatGPT वरून दुर्मीळ आजाराचा लागला पत्ता

अमेरिकेत एका चार वर्षाच्या मुलाला गंभीर आजार झाला होता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यात सर्वांत मोठी समस्या अशी होती की, डॉक्टरांना त्याच्या आजाराचे योग्य निदान करता येत नव्हते.

17 डॉक्टर अपयशी शेवटी ai ने वाचवले 4 वर्षांच्या मुलाचे प्राण chatgpt वरून दुर्मीळ आजाराचा लागला पत्ता

AI Saved Life : आज जगभरात दररोज नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम सोपे होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांचे काम खूप सोपे झाले आहे. आज प्रत्येकजण AI वापरत आहे. आता वैद्यकीय क्षेत्रातही याचा वापर केला जात आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण अलीकडेच एका चार वर्षांच्या मुलाच्या आजाराचे निदान करण्यात एआयला यश आले, तेव्हा समोर आले. खरं तर, एका 4 वर्षाच्या मुलाला काही वेगळाच आजार होता. सुमारे 17 डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण आजाराचे निदान होऊ शकले नाही, त्यानंतरही या चिमुकल्याचा आईने हार मानली नाही. तिने एआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला. ..आणि याचा परिणाम आश्चर्यकारक होता.

हेही वाचा - रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म

अमेरिकेत, अ‍ॅलेक्स नावाचा चार वर्षांचा मुलगा एका गंभीर आणि दुर्मीळ आजाराने ग्रस्त होता. तो तब्बल 3 वर्षांपासून आजारी होता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. एलेक्सला सतत दात दुखणं, वाढ थांबणं, चालताना तोल जाणं आणि शरीराची स्थिती बिघडणं असे लक्षणं दिसायला लागली होती. सर्वात मोठी समस्या अशी होती की, डॉक्टरांना त्याच्या आजाराचे योग्य निदान करता आले नाही. अशा परिस्थितीत, त्याच्या पालकांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि मुलाच्या शरीरात दिसणाऱ्या लक्षणांबद्दल ChatGPT ला माहिती दिली. जेव्हा ChatGPT ने त्यांना मुलाला कोणत्या आजाराने ग्रासले आहे याबद्दल अचूक माहिती दिली आणि त्याला कोणत्या प्रकारच्या त्वरित उपचारांची आवश्यकता आहे हे देखील सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

मुलाच्या आईने सांगितले की, कोरोना काळात त्यांचा मुलगा आजारी पडला होता
मुलाचे आई म्हणाली की, कोरोना साथीच्या काळापासून अॅलेक्सला काही समस्या येऊ लागल्या होत्या, जसे की त्याच्या दातांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. याशिवाय, त्याला स्वतःचे संतुलन राखण्यातही अडचण येत होती.

यानंतर, त्याच्या वडिलांनी MRI नोट्स आणि त्याची सर्व लक्षणे ChatGPT वर अपलोड केली. काही सेकंदातच, एआय टूलने एक संभाव्य आजार शोधून काढला, ज्याला त्याने 'टेथर्ड कॉर्ड सिंड्रोम' असे नाव दिले. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे जो पाठीच्या कण्यावर परिणाम करतो.

यानंतर, अॅलेक्सच्या वडिलांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला आणि अॅलेक्सच्या पाठीच्या कण्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांना आढळले की, आताचे उपचार योग्य आणि सफल ठरले आहेत. तो पूर्णपणे बरा झाला आहे. अ‍ॅलेक्सच्या वडिलांनी ही कहाणी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

हेही वाचा - YouTube Shorts मध्ये येणार नवे AI फीचर्स! व्हिडिओ बनवणं होणार अधिक सोपं

कोणत्याही आजारात डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यकच
या प्रकरणात चिमुकल्याचा जीव वाचला ही चांगली गोष्ट घडून आली असली तरी, डॉक्टरांचा सल्ला न घेता ChatGPT सारखी AI साधने वापरणे धोकादायक आहे. वैद्यकीय क्षेत्रातही एआयचा व्यापक वापर होत असल्याचे मान्य केले जात आहे हे खरे आहे, परंतु तज्ज्ञांनी असा इशाराही दिला आहे की, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय चॅटजीपीटी सारख्या एआय साधनांचा वापर धोकादायक ठरू शकतो. हे कधीही करू नये.


सम्बन्धित सामग्री