Saturday, June 14, 2025 04:28:51 AM

19 वर्षांचे प्रयत्न...15 अयशस्वी IVF उपचार; शेवटी महिलेला AI च्या मदतीने झाली गर्भधारणा

डॉक्टरांनी 20 वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यामध्ये गर्भधारणा करण्यासाठी AI चा वापर केला आहे. AI सिस्टीमचा वापर करून करण्यात आलेली ही पहिलीच गर्भधारणा असल्याचं सांगण्यात येत आहे.

19 वर्षांचे प्रयत्न15 अयशस्वी ivf उपचार शेवटी महिलेला ai च्या मदतीने झाली गर्भधारणा
women get pregnant with Help of AI
Edited Image

नवी दिल्ली: पहिल्यांदाच AI च्या मदतीने गर्भधारणा झाल्याची बातमी समोर आली आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी फर्टिलिटी सेंटरमधील डॉक्टरांनी हा अविष्कार करून दाखवला आहे. डॉक्टरांनी जवळजवळ 20 वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यामध्ये गर्भधारणा करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर केला आहे. एआय सिस्टीममधून ही पहिलीच गर्भधारणा असल्याचे म्हटले जात आहे. कोलंबिया टीमचे संचालक डॉ. झेव्ह विल्यम्स आणि त्यांच्या टीम या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी एक तंत्र विकसित केले आहे जे अझूस्पर्मिया, म्हणजेच वीर्यमध्ये शुक्राणूंची कमतरता बरी करण्यास मदत करते.

कोलंबिया युनिव्हर्सिटी फर्टिलिटी सेंटरमधील शास्त्रज्ञांनी एआयच्या मदतीने, त्यांनी STAR (स्पर्म ट्रॅकिंग अँड रिकव्हरी) नावाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच एखाद्याला गर्भवती करण्यात यश मिळवले आहे. या बातमीमुळे पुरुष वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांसाठी, विशेषतः ज्यांना अ‍ॅझोस्पर्मिया आहे त्यांच्यासाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे. अ‍ॅझोस्पर्मिया ही अशी स्थिती आहे जेव्हा वीर्यामध्ये शुक्राणू आढळत नाहीत. या नवीन एआय तंत्रज्ञानामुळे, आता अशा जोडप्यांना त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यास संधी मिळणार आहे. 

अ‍ॅझोस्पर्मिया म्हणजे काय?

अ‍ॅझोस्पर्मिया म्हणजे जेव्हा पुरुषाच्या वीर्यात एकही शुक्राणू नसतो. जेव्हा एखादा पुरुष लैंगिक संबंध ठेवतो आणि त्याचे वीर्य बाहेर येते तेव्हा त्यात अंडी फलित करण्यासाठी शुक्राणू असणे आवश्यक असते. परंतु अ‍ॅझोस्पर्मियाच्या बाबतीत, ते शुक्राणू अजिबात नसतात. म्हणूनच पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे हे एक प्रमुख कारण आहे. कारण शुक्राणूशिवाय नैसर्गिकरित्या मूल होणे कठीण असते.

हेही वाचा - माकडाचा विचित्र कारनामा! व्यावसायिकाकडून हिसकावली 20 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग

दरम्यान,डॉ. विल्यम्स आणि त्यांच्या टीमने एक आश्चर्यकारक प्रणाली तयार करण्यात पाच वर्षे घालवली आहेत. यामध्ये, एक AI अल्गोरिथम (जो शुक्राणू ओळखतो) एका फ्लुइडिक चिपशी जोडला गेला आहे. यात चिप वीर्य नमुना एका पातळ नळीतून जातो. जर AI ला कोणताही शुक्राणू दिसला, तर वीर्याचा तो छोटासा भाग वेगळ्या नळीत जातो. अशा प्रकारे शुक्राणू साठवले जातात. त्यामुळे अशा प्रकारे शुक्राणू गोठवले जाऊ शकतात किंवा अंड्याचे फलन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

हेही वाचा - OMG! 20 वर्षांपासून पोहून पार करतात शाळेपर्यंतचे अंतर! कोण आहेत व्हायरल 'ट्यूब मास्टर'?

या सिस्टमला STAR (स्पर्म ट्रॅक अँड रिकव्हरी) असे नाव देण्यात आले आहे. ते तयार करण्याची प्रेरणा खगोलभौतिकशास्त्रज्ञांकडून आली आहे.  डॉ. विल्यम्स यांनी सांगितले की, STAR ला खूप दुर्मिळ शुक्राणू शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते या तंत्रज्ञानाची तुलना हजारो गवताच्या ढिगाऱ्यांमध्ये सुई शोधण्याशी करतात, परंतु STAR हे काम काही तासांत करते. 


सम्बन्धित सामग्री