Monday, February 10, 2025 01:01:02 PM

Ministry of Defense with Bharat Dynamics Limited
संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत 2 हजार 960 कोटी रुपयांचा करार

भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे

संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत 2 हजार 960 कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

देशाच्या संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यासाठी आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याच्या चालू प्रयत्नांमध्ये हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे.

'आत्मनिर्भर भारत' वर भर देऊन, बीडीएलद्वारे 'बाय (इंडियन)' श्रेणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्वदेशी सामग्री वापरून केलेली क्षेपणास्त्रे पुरवली जातील. या करारामुळे विविध एमएसएमईसह संरक्षण उद्योगात सुमारे 3.5 लाख श्रमदिन रोजगार निर्माण होईल.


सम्बन्धित सामग्री