मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील मोठी कारवाई समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने नोंदवलेल्या DCB CID CR क्रमांक 86/2024 या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू आहे. हा गुन्हा सुरुवातीला CR क्रमांक 589/2024 म्हणून नर्मल नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 125, आणि 3(5), तसेच शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अशा विविध कलमांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा संबंध बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी असून आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र शुभम रमेश्वर लोणकर, झिशान मोहम्मद अख्तर आणि अनमोल बिश्नोई हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. आज या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 लागू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
वांद्रे परिसरात 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडू हत्या करण्यात आली. या प्रकरणात 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील शुभम रमेश्वर लोणकर, झिशान मोहम्मद अख्तर आणि अनमोल बिश्नोई हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत.