मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणात रुग्णांचा त्वरित शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करत तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी यंदा शहरात पावसाळी आजारांसाठी राखीव अशा तीन हजार रुग्णशय्यांची (बेड) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर तापसदृश आजारांसाठी 'फीव्हर ओपीडी'ची व्यवस्था करण्यात आली आहे.