नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची दरनिश्चिती करण्यात आली आहे. टॅक्सीसाठी २७७० ते २९६० रुपये मोजावे लागणार आहेत. जीपसाठी ३५५० ते ५ हजार रुपये व बससाठी ११५०० पर्यंत भाडे मोजावे लागणार आहे.
निवडणुकीमध्ये खर्चावर नियंत्रण राहावे, उमेदवारांकडून खोटी माहिती दिली जाऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, वाहने यांची दरनिश्चिती केली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर, प्रतितास व चोवीस तासासाठी किती भाडे आकारण्यात येणार याविषयी दर निश्चित केले आहेत. या दराप्रमाणे उमेदवारांनी वापरलेल्या वाहनांचे भाडे खर्चात दाखविणे अपेक्षित आहे. नियमांचे पालन केले नाही तर निवडणूक विभागाच्या माध्यमातून कारवाईही करण्यात येणार आहे.