अलिबाग: अलिबागमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. अलिबाग येथील ऑफिस पार्टी दरम्यान मुंबईतील एका महिलेने तिच्या पुरुष सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. प्राप्त माहितीनुसार, 30 जून रोजी मुंबईतील एका कंपनीतील चौदा कर्मचारी मांडवा येथे अलिबाग तालुक्यातील मुशेट येथील अलास्का व्हिला येथे ऑफिस पार्टीसाठी आले होते. महिनाअखेर असल्याने पीडितेच्या बॉसने तिला ऑफिस कर्मचाऱ्यांचे पगार बिल भरून पार्टीत सामील होण्यास सांगितले. पीडितेने रात्री 8:30 वाजता पगार बिल भरले आणि त्यानंतर ती पार्टीत सामील झाली.
पीडितेने पार्टीत तिच्या सहकाऱ्यांसोबत मद्यपानही केले. जास्त मद्यपान केल्यामुळे ती व्हिलामधील स्विमिंग पूलजवळ झोपली. त्यानंतर तिचे सहकारी तिला उचलून बेडरूममध्ये झोपवण्यासाठी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 च्या सुमारास, पीडितेला कोणीतरी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे जाणवले. तिने पाहिले तेव्हा तिला तिच्या कंपनीतील सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिषेक सावडेकर खोलीतून बाहेर पडताना दिसला. त्यानंतर पीडितेला समजले की, अभिषेक सावडेकरने तिच्या मद्यधुंद अवस्थेत फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
हेही वाचा - उपचाराच्या नावाखाली 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; गडचिरोलीतील बनावट डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, पीडिता खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला खोलीबाहेर आयुष ठक्कर आणि कंपनीत काम करणारा जसपाल सिंग दिसला. तिने त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ते त्यावेळी तिथे नव्हते. जे काही घडलं त्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर पीडिता आरोपी अभिषेकची चौकशी करण्यासाठी गेली. परंतु त्याने खोली बंद केली होती.
हेही वाचा - कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी सुरू; चाकणकरांची माहिती
तथापी, पीडितेने नंतर आरोपी अभिषेकची चौकशी केली. त्यानंतर त्याने घाबरून तिची माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणामुळे पीडितेच्या ऑफिस कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तथापी, या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64, गुन्हे क्रमांक 116/2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.