Thursday, November 13, 2025 02:39:45 PM

Amazon Layoffs: अमेझॉनचा धक्कादायक निर्णय! सकाळी फक्त दोन मेसेज आले अन् 14000 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

अहवालांनुसार, 14000 कर्मचाऱ्यांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात आले. सकाळी पहिल्या मेसेजमध्ये लिहिले होते, &quotकृपया तुमचा ईमेल तपासा”, आणि दुसऱ्यात मदत डेस्क नंबर दिला होता.

amazon layoffs अमेझॉनचा धक्कादायक निर्णय सकाळी फक्त दोन मेसेज आले अन् 14000 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

Amazon Layoffs: जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon) ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. यावेळी मात्र कपातीची पद्धतच सर्वांना हादरवणारी ठरली. हजारो कर्मचाऱ्यांना सकाळीच मोबाईलवर दोन मेसेज आले आणि क्षणात त्यांच्या नोकऱ्या गेल्या.

दोन मेसेज आणि करिअर संपलं 

अहवालांनुसार, 14000 कर्मचाऱ्यांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात आले. सकाळी पहिल्या मेसेजमध्ये लिहिले होते, "कृपया तुमचा ईमेल तपासा”, आणि दुसऱ्यात मदत डेस्क नंबर दिला होता. कर्मचाऱ्यांनी मेल उघडताच त्यांना “तुमची सेवा तात्काळ समाप्त करण्यात आली आहे” असा संदेश दिसला. तथआपी, काहींचे लॉगिन अॅक्सेस तर ते ऑफिसमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंद करण्यात आले.

हेही वाचा - Zepto: ग्राहकांसाठी झेप्टोची आकर्षक रणनीती, ब्लिंकिट आणि स्विगीलाही मागे टाकणार का?

या कपातीमुळे रिटेल मॅनेजमेंट टीम्सवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कंपनीने स्पष्टीकरण दिलं की, व्यवसायातील कार्यक्षमता वाढवणे आणि नवकल्पनांना गती देणे हा या निर्णयामागचा हेतू आहे. तथापि, सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी या कृतीला “अमानवीय टाळेबंदी” म्हटलं आहे. तसेच अनेकांना या कपातीचा मानसिक धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Influencers : आता सोशल मीडियावर 'फुकटचे सल्ले' देता येणार नाहीत! इन्फ्लुएन्सरना सरकारनेच लावला लगाम

अमेझॉनचं स्पष्टीकरण

अमेझॉनच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख बेथ गॅलेट्टी यांनी सांगितलं की, हा निर्णय कठीण असला तरी आवश्यक होता. प्रत्येक प्रभावित कर्मचाऱ्याला आम्ही पाठिंबा देऊ. संबंधित कर्मचाऱ्यांना 90 दिवसांचा पूर्ण पगार, फायदे, सेव्हरन्स पॅकेज आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत दिली जाईल.

AI च्या वाढत्या प्रभावामुळे बदल

गॅलेट्टी यांनी स्पष्ट केलं की, ही कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे कामकाजाच्या पद्धतीत झालेले मोठे बदल यामागचं प्रमुख कारण आहे. AI मुळे अनेक प्रक्रिया स्वयंचलित झाल्या आहेत. त्यामुळे संघटनात्मक रचना नव्याने डिझाइन करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं. अमेझॉनपूर्वी गुगल, मेटा, टेस्ला सारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनीही ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले होते.  


सम्बन्धित सामग्री