Alimony Taxable Rules: घटस्फोटानंतर दिली जाणारी पोटगी म्हणजेच भरणपोषणाची रक्कम ही अनेकदा मोठी असते. काही वेळा ती 50-60 लाखांपर्यंत, तर काही प्रकरणांत कोटी रुपयांच्या घरातही पोहोचते. पण प्रश्न असा ही रक्कम करपात्र आहे का? कर तज्ञ बलवंत जैन यांच्या मते, न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेली एकरकमी पोटगी रक्कम करमुक्त असते. कारण ती ‘उत्पन्न’ नसून ‘सेटलमेंट’ म्हणून दिली जाते. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रतापगड विरुद्ध CIT या प्रकरणातही स्पष्ट करण्यात आले आहे की, एकरकमी पोटगी ही करपात्र नाही.
मासिक भरणपोषणाचे नियम वेगळे
दुसरीकडे, जर पोटगी दरमहा (मासिक) दिली जात असेल, तर ती करपात्र मानली जाते. म्हणजेच पत्नीला मिळणारी ही रक्कम तिच्या वार्षिक उत्पन्नात जोडली जाते आणि त्यावर आयकर भरावा लागतो. कारण ती नियमित स्वरूपात मिळणारे उत्पन्न समजले जाते.
हेही वाचा - Gem Jwellery Policy : 'कस्टम्स अॅक्ट आणि SEZ कायद्यात सुधारणा करा'; 'जेम अँड ज्वेलरी' संघटनेची केंद्राकडे मागणी
मुलांच्या खर्चासाठी दिलेले पैसे करमुक्त
तथापी, जर पतीने घटस्फोटानंतर मुलांच्या संगोपनासाठी किंवा शिक्षणासाठी रक्कम दिली, तर ती करपात्र ठरत नाही. ही रक्कम ‘मेंटेनन्स फॉर चिल्ड्रन’ या वर्गात मोडते आणि त्यावर कर आकारला जात नाही.
हेही वाचा - सावधान! कोणाच्याही कर्जाचा जामीनदार (Guarantor) होण्यापूर्वी दोनदा विचार करा; पुन्हा नाव हटवणं सोपं नाही
पतीला कर सवलत मिळत नाही
याशिवाय, काही लोकांचा असा गैरसमज आहे की घटस्फोटानंतर जर पतीने आपल्या पत्नीला पोटगी दिली तर त्याला काही प्रमाणात आयकर सवलत मिळू शकते. तथापि, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पोटगीची रक्कम एकरकमी दिली जात असली किंवा मासिक पोटगी म्हणून दिली जात असली तरी, पतीला या देयकावर कोणतीही कर कपात मिळत नाही.