Saturday, July 12, 2025 12:24:06 AM

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ यात्रेला जाऊ शकत नाही? काळजी नको.. घरीच करा अशी पूजा

दरवर्षी लाखो भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांच्या रथयात्रेत सहभागी होतात. पण तिकडे प्रत्यक्ष जाता न आल्यास तुम्ही घरीही पूजन करू शकता. जाणून घेऊ, रथयात्रेइतकेच पुण्य देणारे पूजन कसे करावे..

jagannath rath yatra 2025  जगन्नाथ यात्रेला जाऊ शकत नाही काळजी नको घरीच करा अशी पूजा

जगन्नाथ रथयात्रा 2025 : दरवर्षी लाखो भाविक भगवान जगन्नाथ यात्रेला जातात. भगवान जगन्नाथ, बंधू बलभद्र आणि सुभद्रा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. 2025 सालची रथयात्रा 27 जूनपासून सुरू झाली आहे. या दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक रथयात्रेत सहभागी झाले आहेत.

जगन्नाथ रथयात्रा हा एक अतिशय पवित्र आणि भक्तीपर उत्सव आहे. यादरम्यान, मोठ्या संख्येने भाविक रथयात्रेत सहभागी होतात आणि आध्यात्मिक लाभ मिळवतात. हा कार्यक्रम केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर लोकांसाठी सामाजिक एकता आणि उत्सवाचे प्रतीक देखील आहे.

हेही वाचा - Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेत रथाची दोरी ओढणे खूपच शुभ का मानले जाते?

काही कारणांमुळे, काही लोक या भव्य रथयात्रेत सहभागी होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, काही विशेष पूजा आणि उपाय करूनही तुम्ही भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद मिळवू शकता आणि रथयात्रेसारखे पुण्य मिळवू शकता. या उपायांचा उपयोग केल्याने दूर राहूनही भक्त या रथयात्रेचा भाग बनू शकतात आणि आध्यात्मिक शांती मिळवू शकतात.

भगवान जगन्नाथाची अशा प्रकारे पूजा करा
- रथयात्रेनिमित्त दररोज ब्राह्म मुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पिवळे कपडे घाला. कारण पिवळा रंग भगवान विष्णूंचा प्रिय मानला जातो. पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा आणि तेथे तुमच्याकडे उपलब्ध असल्यास गंगाजल शिंपडा. नसल्यास साधे पाणी शिंपडावे आणि पुसून घ्यावे. यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र होईल.
- आता पूजास्थळी पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर पिवळा किंवा लाल रंगाचा कापड पसरवा. यावर तुमच्याकडील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे चित्र किंवा मूर्ती एकत्र असेल ती ठेवा.
- पूजेच्या सुरुवातीला घंटा आणि शंख वाजवा, जेणेकरून अध्यात्मिक पवित्रता वातावरणात पसरेल.
- यानंतर, भगवान जगन्नाथ यांना पंचामृताने स्नान करा. जर मूर्ती नसेल तर चित्रावर किंचितसे गंगाजल (नसेल तर साधे पाणी) शिंपडून स्नान करवा. नंतर त्यांना स्वच्छ कपडे किंवा वस्त्र अर्पण करा. मूर्ती असेल तर, तुम्ही हे वस्त्र कपड्यांप्रमाणे घालू शकता.
- नवीन कपड्यांसह आता भगवानांना ताजी फुले, चंदन, तांदूळ आणि कुंकू अर्पण करा.
- भगवान जगन्नाथांसमोर तुपाचा दिवा लावा.
- भगवान जगन्नाथांना खिचडी अर्पण करावी. कारण, ती त्यांचे आवडते अन्न आहे. याशिवाय तूप, गूळ आणि ताजी फळे अर्पण करा. लक्षात ठेवा की, प्रसादात कांदा आणि लसूण वापरू नये.
- पूजा करताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा शुभ मंत्र म्हणावा. यामुळे मनाची एकाग्रता टिकून राहण्यास मदत होते आणि आध्यात्मिक ऊर्जा संचारित होते.
- पूजन झाल्यानंतर, भगवान जगन्नाथांची आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थना करा.
- प्रसाद अर्पण केल्यानंतर, घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद घ्यावा. यामुळे कुटुंबात सुसंवाद आणि शांती राहते.

हेही वाचा - जगन्नाथ मंदिराच्या 'या' पायरीवर कधीच पाय ठेवत नाहीत.. अशी आहे यमराजाशी जोडलेली अद्भुत कथा

पौराणिक कथा वाचा किंवा ऐका
रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथांच्या जीवनकथा वाचा किंवा ऐका. हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. जसे की, त्यांच्या अवताराची कथा, राजा इंद्रद्युम्नशी संबंधित कथा किंवा रथयात्रेचे महत्त्व इत्यादी. या कथा जाणून घेतल्याने केवळ भक्ती वाढतेच. शिवाय, देवाचे स्वरूप आणि त्याच्या लीला सखोलपणे समजून घेण्यास देखील मदत होते.

दान करा
या पवित्र दिवसांमध्ये अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला पुरी येथून निर्माल्य मिळाले असेल तर, ते तुमच्या अन्नभांड्यात ठेवा आणि ते एखाद्या शुभ कार्यात वापरा. असे मानले जाते की, यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

धार्मिक वातावरण ठेवा
रथयात्रेदरम्यान घर स्वच्छ आणि शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. दररोज अगरबत्ती आणि दिवे लावा, वातावरण सकारात्मक ठेवा आणि भजन-कीर्तन करा. यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळतेच, शिवाय घरात आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी देखील टिकून राहते.

(Disclaimer : ही बातमी प्राप्त माहितीच्या आधारे दिली आहे. यात दिलेली माहिती श्रद्धेवर आधारित आहे. यामधून जय महाराष्ट्र कसलाही दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री