Friday, July 11, 2025 11:47:36 PM

दिलासादायक बातमी! आता स्वस्त दरात मिळणार घर; 'या' 4 सरकारी बँकांची गृहकर्जावरील व्याजदरात कपात

बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. घर खरेदीदारांना मोठा दिलासा देत बँकेने गृहकर्जाचा व्याजदर 7.45 टक्के केला आहे.

दिलासादायक बातमी आता स्वस्त दरात मिळणार घर या 4 सरकारी बँकांची गृहकर्जावरील व्याजदरात कपात
Edited Image

नवी दिल्ली: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदासोबतच पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियानेही गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. याचा फायदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. घर खरेदीदारांना मोठा दिलासा देत बँकेने गृहकर्जाचा व्याजदर 7.45 टक्के केला आहे. 
 
याशिवाय, बँकेने ग्राहकांना आणखी एक भेट दिली आहे. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. यामुळे गृहकर्ज घेणे अधिक परवडणारे झाले आहे. जूनच्या सुरुवातीला बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचा व्याजदर 8 टक्क्यांवरून 7.50 टक्के केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलिकडेच केलेल्या दर कपातीनंतर अनेक सरकारी बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. 

रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्याने चार सरकारी बँकांनी आरबीआयच्या या दराचा थेट फायदा ग्राहकांना दिला आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) चे पालन करणाऱ्या गृहकर्जांवरील व्याजदर थेट कमी झाला आहे. बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियानेही गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत.

इंडियन बँकेचे नवीन दर 

इंडियन बँकेने त्यांचा एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे 1 महिन्याचा एमसीएलआर 8.40 टक्के, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.85 टक्के, 1 वर्षाचा एमसीएलआर 9 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

हेही वाचा - कामाची बातमी! 'या' प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही कोणताही कर

बँक ऑफ इंडियाचा नवीन दर

बँक ऑफ इंडियाने त्यांचा एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर 8.10 टक्के, 1 वर्षाचा एमसीएलआर 9 टक्के आणि 3 वर्षांचा एमसीएलआर 9.15 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा - PNB नंतर आता 'या' बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आकारण्यात येणार नाही

PNB चे नवीन व्याजदर - 

पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांनी कमी केले आहेत. यामुळे एक वर्षाचा एमसीएलआर दर 8.95 टक्क्यांवरून 8.90 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांचा एमसीएलआर दर 9.25 टक्क्यांवरून 9.20 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री