Pakistani Stars Account Again Ban: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी स्टार्सवर पूर्णपणे बंदी घातली होती. एवढेच नाही तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली होती. गेल्या एक-दोन दिवसांत काही पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम प्रोफाइल भारतात दिसू लागले, त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला. परंतु आता भारत सरकारने पुन्हा एकदा भारतातील या पाकिस्तानी स्टार्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली आहे. अभिनेता फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन आणि इतर स्टार्सचे इन्स्टाग्राम प्रोफाइल आता भारतात दिसणे बंद झाले आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स आणि स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवली
AICWA ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले
आज तकच्या वृत्तानुसार, इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने भारतात पाकिस्तानी स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा दिसण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले आणि पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंट पुन्हा बंदी घालण्याची मागणी केली.
हेही वाचा - शेख हसीना यांना मोठा धक्का! न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
पाकिस्तानी स्टार्स आणि यूट्यूब चॅनेलवर पुन्हा बंदी -
AICWA च्या मागणीनंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूब चॅनेलवर पुन्हा बंदी घातली आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिलजीत दोसांझच्या चित्रपट 'सरदार जी 3' मध्ये दिसली, त्यानंतर भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली होती.