Sunday, March 08, 2026 11:20:25 PM

IPL 2026: RCB चाहत्यांची प्रतीक्षा संपली! चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा रंगणार क्रिकेटचा थरार; पाहा IPL 2026 चे वेळापत्रक

गेल्या वर्षी 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीचा होम ग्राउंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.

ipl 2026 rcb चाहत्यांची प्रतीक्षा संपली चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा रंगणार क्रिकेटचा थरार पाहा ipl 2026 चे वेळापत्रक

IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले असतानाच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीचा होम ग्राउंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. गेल्या वर्षी जेतेपदाच्या जल्लोषात झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर या मैदानावर एकही सामना झाला नव्हता, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत.

चिन्नास्वामी येथे रंगणार दिमाखदार उद्घाटन सोहळा
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल 2026 चा भव्य उद्घाटन समारंभ याच ऐतिहासिक चिन्नास्वामी मैदानावर पार पडणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, गतविजेत्या संघाच्या होम ग्राउंडवर हंगामाचा पहिला सामना खेळवला जातो. त्यानुसार, आरसीबीचा पहिला सामना बंगळुरूमध्येच होणार आहे. इतकेच नव्हे तर, यावर्षीचे आयपीएल उपांत्य (Semi-finals) आणि अंतिम (Final) सामने देखील याच मैदानावर खेळवले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आरसीबीचे 5 सामने बंगळुरूमध्ये, तर 2 सामने रायपूरमध्ये
या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ त्यांचे एकूण 5 होम मॅचेस चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. उर्वरित 2 होम मॅचेस रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर आयोजित केले जातील. चिन्नास्वामी स्टेडियम हे नेहमीच हाय-स्कोअरिंग सामने आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादासाठी ओळखले जाते. त्यामुळे आपल्या लाडक्या संघाला घरच्या मैदानावर जेतेपद राखताना पाहण्यासाठी चाहते आतापासूनच सज्ज झाले आहेत.

हेही वाचा - ICC Ranking: ICC रँकिंगमध्ये भारतीय महिला संघाचा दबदबा; स्मृती मानधना पुन्हा बनली जगातील नंबर 1 फलंदाज

आरसीबी फ्रँचायझीकडून कर्नाटक सरकारचे आभार
बंगळुरूमध्ये सामने आयोजित करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल आरसीबी फ्रँचायझीने कर्नाटक सरकार, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि कर्नाटक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत. स्टेडियममधील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपायांमध्ये वेळेत सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले, ज्यामुळे गतविजेत्या संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर खेळणे शक्य झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेत केलेल्या या मोठ्या बदलांमुळे आता चाहत्यांना निर्भयपणे सामन्याचा आनंद घेता येईल.


सम्बन्धित सामग्री