विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात सावकारांच्या जाचाला कंटाळून शहरातील बटाटा व्यापारी शेख करीम शेख चुन्नू यांनी (45) घरातच गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कारणीभूत ठरलेल्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गळफास घेण्यापूर्वी करीम यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड काढला. त्यावरून अन्नू आझाम शेख (रा. गोल्डन नगर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई, विनोद राजपूत (परदेशी गल्ली, वैजापूर), मुकेश राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर) आणि विक्रम राजपूत या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पैशांच्या कारणावरून शेख करीम यांना त्रास दिल्याचे समजते.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; e- kyc बाबत मंत्री आदिती तटकरेंची नवीन पोस्ट
व्हिडिओतील संवाद -
'ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हूं लेकीन मैं थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू...', असा 42 सेकंदांचा व्हिडिओ काढून शेख करीम यांनी गळफास घेतला. या सततच्या मानसिक छळामुळे करिम प्रचंड अस्वस्थ झाले होते.