Saturday, January 18, 2025 05:34:54 AM

Case registered against bunty shelke and activist
मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांना शासकीय कामात अडथळा आणणे चांगले भोवले आहे.

मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांना शासकीय कामात अडथळा आणणे चांगले भोवले आहे. काँग्रेचे बंटी शेळके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शासकीय संपत्ती तोडफोड करणे, शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, धमकावणे यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील परिसरातील एका मतदान केंद्रावरून झोनल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या वाहनांची काँग्रेसचे मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पोलिसांच्या ओतोनात प्रयत्नातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर वाहनात असलेली अतिरिक्त ईव्हीएम मशीन सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आली.

ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची अडवणूक करणे व त्या वाहनाची तोडफोड केल्यामुळे पोलिसांनी बंटी शेळके आणि त्यांच्या समर्थकांना सरकारी कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यासाठी नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण ?

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरात एका मतदान केंद्राच्या आवारातून एक गाडी बाहेर पडली. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचारी काही मतदान यंत्र (ईव्हीएम) घेऊन जात असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना दिसले. त्यादरम्यान मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये जमा करण्याचे काम चालू होते. या प्रक्रियेचे उल्लंघन होत असल्याचा संशय काँग्रेस जमावाला आला. त्यामुळे त्यांनी मतदान यंत्र घेऊन जात असलेल्या वाहनाचा पाठलाग केला. काही वेळानंतर त्यांनी त्या वाहनाला थांबवले आणि जबरदस्त तोडफोड केली. त्याचवेळेस पाठीमागून कर्मचाऱ्यांना घेऊन येत असलेल्या गाडीने घडलेला प्रकार पाहून गाडी थांबवली. त्यावेळी जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली.  


सम्बन्धित सामग्री