Monday, February 10, 2025 07:17:41 PM

Chhatrapati Sambhajinagar
पतंगाच्या नादात शाळकरी मुलानं जीव गमावला

पतंगाच्या नादात स्वत:चा जीव गमावल्याची घटना घडली आहे.

पतंगाच्या नादात शाळकरी मुलानं जीव गमावला

छत्रपती संभाजीनगर : मकर संक्राती जवळ आली की मुलांमध्ये पतंग खेळ्याचे प्रमाण वाढते. या पतंगानेच एका मुलाचा घात केला आहे. पतंगाच्या नादात स्वत:चा जीव गमावल्याची घटना घडली आहे. पवन शांतीकुमाल राठोड असे या मुलाचे नाव आहे. हा मुलगा 14 वर्षाचा होता. पतंगाच्या नादात शाळकरी मुलाने जीव गमावला. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरामधील एक 14 वर्ष असलेला मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी न जाता रस्त्यामध्ये कटलेला पतंगाला पकडण्यासाठी त्या पतंगाच्या मागे धावत असताना तिथे रस्ताच्या कडेला असल्यालेल्या नाल्यामध्ये पडून या मुलाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : आश्रम शाळेतील निकृष्ट जेवणाबाबत खोसकर आक्रमक
 

नेमकं काय घडलं ? 
मकर संक्रांतीचा सण जवळ आला असताना संभाजीनगरात अत्यंत वाईट घटना घडली आहे. पवन नावाचा 14 वर्षीय मुलगा शाळा सुटली. परंतु घरी न जाता तो पतंग खेळत बसला. पतंग खेळताना त्याची पतंग कटली. ही कटलेली पतंग शोधताना तो पतंगाच्या मागे मागे धावत राहिला. ही पतंग शोधण्याच्या नादात त्याला रस्त्याच्या कडेला असणारा नालादेखील दिसला नाही. याच पतंगाच्या पायी नाल्यात पडून या 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री