Tuesday, November 18, 2025 09:58:40 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पोची खाजगी बसला धडक

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने खाजगी प्रवासी बसला मागून धडक दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पोची खाजगी बसला धडक

मुंबई : द्रुतगती महामार्गावर नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने खाजगी प्रवासी बसला मागून धडक दिली. यामुळे बस रस्ता सोडून 20 फूट खोल खड्ड्यात उलटली.


पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्या प्रवाशांवर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघात ग्रस्त बस सांगोल्याहून मुंबईकडे निघाली होती.


सम्बन्धित सामग्री