Thursday, November 13, 2025 08:48:07 AM

Viral Video: बिकनी घालून गंगेत उडी, महिलेला नेटकऱ्यांनी धुतलं

डुबकी मारण्यापूर्वी ती ते हार पाण्यात फेकते. स्नान करताना ती 'ओम नमः शिवाय' आणि 'गंगा मैया की जय' असे उच्चारत आहे.

viral video बिकनी घालून गंगेत उडी महिलेला नेटकऱ्यांनी धुतलं

Woman In Bikini Takes Dip In Ganga:  सोशल मीडियावर सध्या बिकिनी घातलेल्या एका परदेशी महिलेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला गंगा नदीत स्नान करताना दिसते. तिच्या गळ्यातील काही फुलांचे हारही दिसत आहेत. मात्र डुबकी मारण्यापूर्वी ती ते हार पाण्यात फेकते. स्नान करताना ती 'ओम नमः शिवाय' आणि 'गंगा मैया की जय' असे उच्चारत आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये, महिलेने कपाळावर चंदनाचा लेप लावलेला दिसत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोकांनी भिन्न प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला पवित्र गंगा नदीचा अपमान म्हटले आहे. तर काहींनी महिलांचा स्वातंत्र्याचा अधिकार आणि स्वतःच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा हक्क यावर लक्ष वेधले आहे.

हेही वाचा - Viral Video: शेतकरी बापाने मुलीच्या स्कुटीसाठी जमा केली 40 हजारांची नाणी, पोतं घेऊन थेट शोरुममध्ये पोहोचला

तथापी, हा व्हायरल व्हिडिओ ऋषिकेशमधील लक्ष्मण झुला जवळच्या गंगा नदीचा असल्याचे सांगितले जात आहे. मुनिकिरेतीचे निरीक्षक प्रदीप चौहान आणि स्टेशन हाऊस ऑफिसर संतोष पठवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

पहा व्हिडिओ - 

हेही वाचा - Delhi Taj Hotel: ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल आणि मांडी घालून बसण्यावरून महिलेला अपमानास्पद वागणूक, व्हिडीओ शेअर करत महिला संतापली

ऋषिकेशचे धार्मिक महत्त्व

ऋषिकेश गंगा नदीच्या काठावर आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे शहर योग साधनेची राजधानी म्हणून प्रसिद्ध असून, अनेक आश्रम आणि योग केंद्रे येथे आहेत. या शहरातील त्रिवेणी घाट, लक्ष्मण झुला आणि राम झुला सारखी स्थळे भक्तांसाठी लोकप्रिय आकर्षणे आहेत.
 


सम्बन्धित सामग्री