मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेता अभिषेक गांवकर आणि रिलस्टार सोनाली गुरव लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतच अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकांऊटवर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
अभिनेता अभिषेक गांवकरने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अभिषेक आणि रिलस्टार सोनालीने गोड उखाणी घेतला आहे. या उखाण्यातून गांवकरांची सून असल्याचे ती अभिमानाने सांगताना दिसत आहे. या पोस्टमध्ये लग्नादरम्यान सात फेरे आणि बाकी विधी करताना दिसत आहे. लग्नसोहळ्यात सोनालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तर अभिषेकने तिच्या नऊवारीला साजेसा कुर्ता आणि धोतर नेसले होते. डेस्टिनेशन वेडिंग केल्याचे पाहायला मिळाले आहे. या लग्नसोहळ्यात दोघांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
अभिषेकच्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एप्रिल महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता आणि सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता ही जोडी विवाहबद्ध झाली आहे. अभिषेकने सारं काही तिच्या या मालिकेत श्रीनू हे पात्र साकारलं आहे. या पात्रावर प्रेक्षक प्रेम करताना दिसून येतात. तर रिल्स स्टार सोनाली गुरव हीदेखील नेहमी चर्चेत असते.
सोनालीने बदलले नाव
नुकतच अभिषेक गांवकर आणि सोनाली गुरव लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर सोनालीने एक पोस्ट सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वत:चे नाव बदलले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सोनालीने तिचे नाव बदलल्याचे दिसत आहे. या पोस्टला तिने मिसेस वामिका अभिषेक गांवकर असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून लग्नानंतर सोनालीने नावात बदल केल्याचे पाहायला मिळते आहे.