Sunday, March 16, 2025 08:57:08 AM

संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांचा राडा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांचा राडा

संभाजीनगर : राज्यात बुधवारी विधानसभा निवडणुक पार पडली. मतदानाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये एमआयएम व भाजपा कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडले. त्यानंतर पश्चिम मतदार संघात ठाकरे सेनेचे उमेदवार राजू शिंदे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी पोलिसांकडून मतदारांवर लाठी चार्ज करण्यात आला. पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमध्ये चार जण जखमी झाले. ठाकरे गटाचे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राजू शिंदे यांनी रस्त्यावर ठिय्या केल्याने पोलिसांनी लाठ्या चालवल्या.  

नारेगावात मतदारांना हिरवे रूमाल का घेतले असा जाब विचारल्याने अपक्ष उमेदवार शहजाद खान आणि एमआयएम कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी हाणामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पिटाळले. शिवसेना शिंदेंच्या पक्षातील संजय शिरसाठ यांच्याकडून एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आली. एका नेत्याकडून कार्यकर्त्याला शिवीगाळ होते. तरी त्यावर काहीच कारवाई होत नाही. हे भयंकर आहे.

 

संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांच्यामध्ये राडे झाले. तर काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मतदानाच्या दिवशी निवडणुकीचे कर्तव्य बजावताना पोलिस पाहायला मिळाले. मात्र हाणामारी, राडे, भांडणं यावर पोलिसांकडून कारवाई व्हायला हवी.

विधानसभा निवडणुकीच्या दिवशी अशा घटना होऊनही पोलिसांनी त्यावर अद्याप एकही कारवाई किंवा गुन्हा दाखल झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी झालेल्या घटनांवर पोलिसांकडून आज गुन्हा दाखल होणार का ?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.     

 

 

   

 


सम्बन्धित सामग्री