मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्याने मुंबई पोलिसांना मेसेज पाठवला आहे. सलमानकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे मिळाले नाही तर सलमान ठार मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी सलमानला बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्या आहेत. सलमानच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार करण्याचा प्रकार पण घडला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून तपास करत आहेत. मेसेज करणाऱ्या अज्ञाताचाही शोध सुरू आहे.