मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ऐंशी लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाभार्थ्यांना १४ ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र महिलांना १७ ऑगस्टपर्यंत लाभ मिळेल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी चौदा ऑगस्टपर्यंत एक कोटी बासष्ट लाखांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे; असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.