श्रीवर्धन : विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्यास सुरू सुरूवात झाली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अदिती तटकरे या निवडणूक लढल्या होत्या. आदिती या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अदिती तटकरे उभ्या राहिल्या होत्या. अदिती तटकरेंच्या विरूद्ध अनिल नवगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी उभे होते. अदिती तटकरे विजयी होण्याचे चिन्ह सुरूवातीपासून होती. कारण त्यांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरे यांचा प्रभाव फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे तटकरे या पुन्हा गड राखतील असे चित्र स्पष्ट दिसत होते.