बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुत्रधाराचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर अखेर मकोका लावण्यात आला आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस संपल्याने मंगळवारी बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय देत वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच, कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही ठोठावण्यात आली आहे.
न्यायालयाने कराडला मकोका लावल्यानंतर परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांकडून वेगवेगळी आंदोलनं केली गेली. कुठे समर्थक टावरवर चढले आहेत, तर कुठे जाळपोळ केली. परळी बंदची हाक देण्यात आल्याने बीडमध्ये वातावरण तणावाचं झालं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कराडच्या अटकेनंतर आता देशमुख कुटुंबीय आणि कराड कुटुंबीय यांचे परस्परविरोधी आंदोलन तीव्र झालं आहे. दोन्ही समर्थकांकडून यात जातीयवादाचे राजकारण होत असल्याचा आरोप आहे. देशमुख यांची हत्या होवून सव्वा महिना उलटला तरी अद्याप तपास यंत्रणांचा तपास पूर्ण झाला नसून दिवंगत देशमुख यांना न्याय देण्यासाठी सुरेश धस यांच्यासह सर्व विरोधक एकटवलेत.
हेही वाचा : कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन