Friday, November 14, 2025 08:36:23 AM

अहमदनगरचे नाव 'अहिल्यानगर' होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे, आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे होणार आहे.

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार 

मुंबई : अहमदनगरचे 'अहिल्यानगर' नामांतरास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे नामांतर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती, आणि यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार केला होता. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे, आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे होणार आहे. या निर्णयामुळे नगरमधील नागरिकांमध्ये आनंदाचा उत्साह आहे, आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावावरून हे नामांतर होणार असल्यामुळे या ऐतिहासिक निर्णयास स्थानिक नागरिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. केंद्रीय सरकारच्या या निर्णयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.


सम्बन्धित सामग्री