Thomas Kurian On AI: गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस ही कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी तंत्रज्ञान नाही, तर त्यांना आधार देणारी तंत्रज्ञान आहे. एआयचा उद्देश कामगारांना त्यांच्या कामात मदत करणे आणि त्यांची उत्पादकता वाढवणे आहे, त्यांना काढून टाकणे नाही, असं थॉमस कुरियन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Instagram Account Ban: तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट कोणी बंद करू शकते का? जाणून घ्या तक्रार कुठे करायची?
कुरियन यांनी गुगलच्या एआय-संचालित ग्राहक सहभाग सूटचा उदाहरण देत सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे क्लायंट सेवेत सुधारणा झाली आहे, परंतु कर्मचार्यांना काढून टाकण्याची गरज भासलेली नाही. ते म्हणाले, जेव्हा हे तंत्रज्ञान लाँच झाले तेव्हा लोकांना भीती होती की नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, परंतु असे काही झाले नाही.
हेही वाचा - Crime News : ...म्हणे, 'मी गंमत करत होतो'; 13 वर्षाच्या मुलाने ChatGPT ला विचारला असा प्रश्न, झाली थेट तुरुंगात रवानगी
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही यापूर्वी असे म्हटले आहे की, एआयमुळे गुगल अभियंत्यांची उत्पादकता 10 टक्क्यांनी वाढली आहे, ज्यामुळे कर्मचारी अधिक सर्जनशील आणि महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करू शकतात. कुरियन यांनी हेही नमूद केले की, एआय कर्मचार्यांना त्यांच्या नोकऱ्यांवरून काढून टाकण्याऐवजी स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यास आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करते. त्यांनी सांगितले की एआय ही माहिती जलद मिळवण्यासाठी, ग्राहकांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी एक सहाय्यक साधन आहे.