Sunday, November 16, 2025 09:24:11 AM

त्रिचीच्या आकाशात घोंघावणारे संकट टळले

तामिळनाडूतील त्रिचीच्या आकाशात घोंघावत असलेले संकट टळले आहे.

त्रिचीच्या आकाशात घोंघावणारे संकट टळले

त्रिची : तामिळनाडूतील त्रिचीच्या आकाशात घोंघावत असलेले संकट टळले आहे. 

लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उतरवणे कठीण झाले होते. सुमारे दोन तास हे विमान तामिळनाडूतील त्रिचीच्या आकाशात घिरट्या घालत होते. अखेर हे विमान सुरक्षितरित्या त्रिची विमानतळावर उतरले आहे.

याआधी विमानाने त्रिचीच्या विमानतळावरुन शारजाला जाण्यासाठी उड्डाण केले. पण प्रतिकूल हवामानामुळे विमान परत त्रिचीच्या दिशेने फिरवण्यात आले. विमान उतरवण्याच्यावेळी लँडिंग गिअरमध्ये बिघाड निर्माण झाला. यामुळे विमान उतरवणे कठीण झाले होते. त्रिची विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका संकटाची शक्यता गृहित धरुन सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. अखेर विमान त्रिची विमानतळावर उतरले आणि संकट टळले. विमानातील सर्व प्रवासी, क्रू सदस्य सुरक्षित आहेत. संकटात सापडलेल्या विमानात १४१ जण होते. सर्वजण सुरक्षित आहेत.

  

सम्बन्धित सामग्री