Tuesday, November 11, 2025 01:23:13 AM

एअर इंडिया करणार १ हजार ६५२ पदांची भरती

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लि. कंपनीतर्फे १,६५२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

एअर इंडिया करणार १ हजार ६५२ पदांची भरती

 

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लि. कंपनीतर्फे १,६५२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापैकी सर्वाधिक १,०६७ पदांची भरती मुंबई विमानतळासाठी होणार आहे तर, अहमदाबाद विमानतळासाठी १५६ आणि गोव्यातील दाबोलीम विमानतळासाठी ४२९ जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रामुख्याने ग्राहक सेवा अधिकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा अधिकारी, रॅम्प सेवा कर्मचारी, युटिलिटी एजंट तसेच रॅम्प ड्रायव्हर आदी महत्त्वपूर्ण सेवांसाठी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री