राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होती की, विमानातील सर्व सहा प्रवासी यामध्ये मृत्युमुखी पडले. दरम्यान, या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान अपघाताबाबत स्पष्ट केलं आहे की, त्यांनी अद्याप कोणालाही समन्स बजावलेला नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकृत तपास आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (AAIB) सोपवण्यात आला असून पुढील सर्व चौकशी आणि निर्णय AAIB घेणार आहे. AAIB कडून तपास प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून या प्रकरणातील प्रत्येक बाब सखोलपणे तपासली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : विमान लॅंडिंगचा पहिला प्रयत्न झाला, पण दुसरा प्रयत्न फसला!; अपघाताबाबतची ही चकीत करणारी माहिती समोर