Tuesday, December 10, 2024 10:46:21 AM

Ajit Pawar Baramati Speech
'वाढपी तुमचा असला की जेवायला मजा येते'

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य

वाढपी तुमचा असला की जेवायला मजा येते

नवनाथ बोरकर बारामती : अजित पवार हे कधी काय बोलतील याचा अंदाज घेणं कठीण असतं. त्यांनी अनेक वेळा बोलून अडचणीत आले आहेत, आणि त्यांच्या भाषणामध्ये नेहमीच एक वेगळा विनोद असतो. आज, बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यावर असताना, उंडवडी सुपे गावात आल्यानंतर त्यांनी थेट माईकवर भाषणाला सुरुवात केली.

"मी बारामतीला नऊ हजार कोटी रुपयांचा निधी दिला हे कशामुळे झाले? कारण मी राज्याचा अर्थमंत्री होतो," असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, "वाढपी तुमचा असला की जेवायला मजा येते."

अजित पवारांनी इतर तालुक्याला निधी दिला असल्यामुळे चाळीस आमदार आमच्या बरोबर आले.  आमदारांच्या कामाचा धमक आणि ताकद अद्याप कायम आहे, हे बारामतीकरांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

''गावच्या महिलांनी त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं, "अहो, तुम्ही बसा, मी उभा आहे. मला कुठं बसायला सांगता?" त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवारांची संवाद शैली नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते, आणि त्यांच्या विनोदी अंदाजामुळे उपस्थितांमध्ये उत्साह आणि आनंदाची लहरी निर्माण होते.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo