Tuesday, December 10, 2024 10:12:00 AM

Ajit Pawar
'अजित पवार पावरफूल नेता'

आमचा नेता अजितदादा पावरफूल, अजितदादा पावरफूल... या शब्दात अजित पवारांच्या समर्थकाने त्यांचे कौतुक केले.

अजित पवार पावरफूल नेता

बारामती : आमचा नेता अजितदादा पावरफूल, अजितदादा पावरफूल... या शब्दात अजित पवारांच्या समर्थकाने त्यांचे कौतुक केले. परंपरेनुसार यंदा दिवाळी दसऱ्यानिमित्त अजित पवारांच्या घरी विशेष सोहळा होता. या निमित्ताने लाडक्या नेत्याला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विक्रमी मताधिक्याने विजय होईल, असाही विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अजित पवारांचा समर्थक असलेल्या एका व्यक्तीने शीघ्र काव्य रचले सादर केले. 'आमचा नेता अजितदादा पावरफूल, अजितदादा पावरफूल...' असे म्हणत अजित पवारांच्या समर्थकाने त्याची छोटेखानी कविता सादर केली. उपस्थितांनी या शीघ्र काव्याला मनापासून दाद दिली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी किती उमेदवार विजयी होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी राज्यात एका टप्प्यात मतदान होईल आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo