मुंबई : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर या शासकीय बंगल्यावर भेट झाली. या भेटीत महायुतीतील बंडखोरीच्या मुद्यावर चर्चा झाली. बंडखोरांना हाताळण्याच्या डावपेचांवर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे.