पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीसाठी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ३ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
काय आहे अजित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट -
अजित पवार यांनी आज रोजी या भेटीदरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. प्रकाश (बाळासाहेब)आंबेडकर यांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकरच लोकसेवेत रुजू व्हावेत, अशी मी प्रार्थना केली."