Friday, June 13, 2025 06:07:45 PM

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी

बदलापुरात चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी

बदलापुरात चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिंदेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या प्रकरणात वापरलेली पोलिसांच्या वाहनाची तपासणी न्यायवैज्ञानिक विज्ञान शाखेच्या तज्ज्ञांनी मंगळवारी केली. पोलिसांच्या कोठडीत असताना अक्षयचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची राज्य सीआयडीकडून चौकशी केली जाणार आहे. सीआयडीचे पथक मुंब्रा बायपास येथेही दुर्घटना स्थळाला भेट देऊन त्याची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर, वाहनात असलेल्या सर्व पोलिसांचे जबाबही नोंदवले जातील. तसेच, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे जबाबही अधिकारी नोंदवतील.


सम्बन्धित सामग्री