मालेगाव : महाराष्ट्रात व्होट जिहादसाठी १२५ कोटी रुपयांचे वाटप झाल्याची तक्रार भाजपाने केली आहे. व्होट जिहाद प्रकरणी भाजपाने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडे तक्रार नोंदवली आहे. मालेगावमधील सिराज अहमद आणि मोईन खान यांच्या खात्यात १२५ कोटी रुपये जमा झाले. यासाठी बँकांच्या विविध १७५ शाखांमधून पैसे ट्रान्सफर करण्यात आले. मालेगावमध्ये सिराज अहमद आणि मोईन खान यांच्या नावाने दोन डझन बनावट खाती आहेत. या खात्यांच्या माध्यमातून व्होट जिहादसाठी पैशांचे वाटप झाल्याची तक्रार भाजपाने केली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. भाजपाच्या तक्रारीमुळे राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.