Tuesday, February 17, 2026 05:44:59 PM

Amazon: वारंवार रिटर्न आणि रिफंड करणाऱ्यांसाठी मोठा इशारा! ॲमेझॉनचे नवे नियम जाणून घ्या

अ‍ॅमेझॉनने आपल्या युझर्सना स्पष्टपणे सूचित केले आहे की, रिटर्न प्रोसेसचा गैरवापर करणाऱ्यांवर आता करडी नजर ठेवली जाईल. यामुळे बेजबाबदार युझर्सवर चाप बसणार आहे.

amazon वारंवार रिटर्न आणि रिफंड करणाऱ्यांसाठी मोठा इशारा ॲमेझॉनचे नवे नियम जाणून घ्या

Order Cancellation on Amazon :ऑनलाइन शॉपिंगची सवय असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने आपल्या रिटर्न आणि रिफंड पॉलिसीमध्ये (Amazon Return and Refund Policy) मोठे बदल केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांना आता थेट इशारा दिला जात आहे. जर तुम्ही वारंवार ऑर्डर कॅन्सल करत असाल किंवा रिफंडची मागणी करत असाल, तर तुमचे Amazon अकाउंट कायमचे ब्लॉक होऊ शकते.

अ‍ॅमेझॉनने का उचलले हे कठोर पाऊल? (Amazon Shopping)
अ‍ॅमेझॉनने आपल्या युझर्सना स्पष्टपणे सूचित केले आहे की, रिटर्न प्रोसेसचा गैरवापर करणाऱ्यांवर आता करडी नजर ठेवली जाईल. मुळात प्रत्येक रिटर्नमुळे कंपनी आणि विक्रेते (Sellers) दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसतो. यामध्ये लॉजिस्टिक्स खर्च, मालाची गुणवत्ता तपासणे, री-पॅकेजिंग आणि अनेकदा उत्पादनाचे होणारे नुकसान यामुळे कंपनीचा ऑपरेशन्स खर्च वाढतो. रिटर्न ही 'शॉपिंगची सवय' बनण्यापासून रोखण्यासाठी कंपनीने आता नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

तुमचे 'हे' वर्तन ठरू शकते धोक्याचे
कंपनी केवळ एक किंवा दोन रिटर्नवर कारवाई करत नाही, तर ग्राहकाच्या दीर्घकालीन खरेदीच्या नमुन्याचा (Pattern) अभ्यास करते. अ‍ॅमेझॉनच्या मते, खालील कृती केल्यास तुमचे अकाउंट धोक्यात येऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- उत्पादने वारंवार परत करणे.
- शिपमेंट निघाल्यानंतर वारंवार ऑर्डर कॅन्सल करणे.
- डिलिव्हरी आल्यानंतर उत्पादन नाकारणे.
- 'नॉन-रिटर्नेबल' उत्पादनांवर मुद्दाम रिफंड मागणे.
- एकाच उत्पादनाचे अनेक प्रकार मागवून त्यातील बहुतेक परत करणे.

हेही वाचा - Budget 2026 : खरेदीदारांचा हिरमोड! वाहन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा नाहीत; आता गाड्या स्वस्त होणार की महाग?

अकाउंट ब्लॉक झाल्यास काय होईल?
एकदा अ‍ॅमेझॉनने इशारा देऊनही तुमचे वर्तन सुधारले नाही, तर कंपनी तुमच्या अकाऊंटसाठी रिटर्न आणि रिफंडवरती मर्यादा आणू शकते किंवा तुमचे अकाउंट पूर्णपणे ब्लॉक करण्याचा निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला पुन्हा अ‍ॅमेझॉनवर खरेदीची संधी मिळणार नाही. तसेच, तुम्ही तुमच्या अकाउंटमधील Order History, Amazon Pay Balance, Gift Cards आणि Prime सारख्या सेवांचा अ‍ॅक्सेस कायमचा गमावू शकता. एकदा ब्लॉक झालेले अकाउंट पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करणे अत्यंत कठीण असते, त्यामुळे ग्राहकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

अकाउंट बॅन टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
आपले अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाचे डिटेल्स आणि रिव्ह्यू काळजीपूर्वक वाचा. अनावश्यक रिटर्न टाळण्यासाठी 'आता गरज नाही' असे कारण वारंवार देऊ नका. जर तुम्हाला खरोखरच खराब किंवा चुकीचे उत्पादन मिळाले असेल, तर किमान शक्य त्या वेळी रिफंड मागण्याऐवजी 'रिप्लेसमेंट' किंवा 'एक्सचेंज'चा पर्याय निवडा. जबाबदार ग्राहक म्हणून खरेदी केल्यास तुम्हाला Amazon च्या सेवांचा विना अडथळा लाभ घेता येईल.

हेही वाचा - Mozilla Firefox Hacking Threat: सावधान! लाखो इंटरनेट वापरकर्त्यांना हॅकिंगचा धोका; भारत सरकारकडून 'हाय अलर्ट' जारी


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या