मुंबई : लोकसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल यांनी हिंदूंविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. विधान परिषदेत या विषयावर बोलण्यासाठी भाजपाचे प्रसाद लाड उभे राहिले. त्यांनी राहुल यांच्या निषेधाचा ठराव मांडला आणि तो लोकसभेत पाठवण्याची मागणी केली. लाड यांनी ठरावावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावे अशीही मागणी केली. यावेळी अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे बघत शिवी दिली असा आरोप भाजपाच्या आमदारांनी केला. शिवीगाळ प्रकरणी नियमानुसार सभागृहातील कामकाजाचे व्हिडीओ तपासून उपसभापतींनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.