Tuesday, January 21, 2025 04:57:12 AM

Amit Shah
अमित शाहांच्या शनिवारच्या सभा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रात शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या चार सभा रद्द झाल्या आहेत.

अमित शाहांच्या शनिवारच्या सभा रद्द

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रात शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या चार सभा रद्द झाल्या आहेत. अमित शाहा नागपूर येथून दिल्लीला रवाना झाले आहेत. मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शाह यांच्या कार्यक्रमात बदल झाला. दिल्लीत अमित शाह मणिपूरमधील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. 

नियोजीत कार्यक्रमानुसार अमित शाह यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या. गडचिरोली, वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोल येथे सभा व्हायच्या होत्या. या सभा रद्द झाल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री शनिवारचे कार्यक्रम झाल्यानंतर नागपूर येथे मुक्कामाला होते. ते रविवारी चार सभा घेऊन नंतर दिल्लीला जाणार होते. पण आयत्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. 

मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे. जिरीबाम आणि फेरजॉल जिल्ह्यात दूरसंचार आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मैतेई आणि कुकी समुदायातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत अमित शाह मणिपूरमधील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. 


सम्बन्धित सामग्री