मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दोऱ्यावर आहेत. अमित शाह मंगळवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. तर बुधवारी ते नाशिक आणि कोल्हापूर येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकांतून अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.