Thursday, December 12, 2024 07:23:16 PM

Amit Shah
काँग्रेसच्या लांगूलचालनावर अमित शाह यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पाकिस्तानमधून आलेल्या १८८ हिंदूना भारताचे नागरिकत्व देण्यात आले. याप्रसंगी बोलताना काँग्रेसकडून होणाऱ्या मुसलमानांच्या लांगूलचालनावर अमित शाह यांनी टीका केली

काँग्रेसच्या लांगूलचालनावर अमित शाह यांची टीका

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पाकिस्तानमधून आलेल्या १८८ हिंदूना भारताचे नागरिकत्व देण्यात आले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदींच्या आधारे हे नागरिकत्व देण्यात आले. याप्रसंगी बोलताना काँग्रेसकडून होणाऱ्या मुसलमानांच्या लांगूलचालनावर अमित शाह यांनी टीका केली. 

भारताची फाळणी धर्माआधारे झाली. पण काँग्रेसने निर्वासित हिंदूंवर अन्याय केला. घुसखोरांना नागरिकत्व देण्याला प्राधान्य देणाऱ्या काँग्रेसने नियमानुसार अर्ज करणाऱ्या अनेक हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी विलंब केला. मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणले. हिंदूंवरील अन्याय दूर केला; असे अमित शाह म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कोणाचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी नाही तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या निर्वासित हिंदू, जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे; असे अमित शाह यांनी सांगितले.

काँग्रेसने कायम मुसलमानांचे  लांगूलचालन करण्याला प्राधान्य दिले. घुसखोरांना नागरिकत्व देणाऱ्या काँग्रेसने शरण आलेल्या आणि नियमानुसार नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या निर्वासित हिंदूंकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसच्या या लांगूलचालनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादच्या कार्यक्रमात बोलताना टीका केली. 

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo