Saturday, February 08, 2025 03:41:22 PM

Amit Thackeray
वडिलांच्या चुकीची मुलाला शिक्षा

माहिममध्येअमित ठाकरेंचा पराभव झाला आहे.

वडिलांच्या चुकीची मुलाला शिक्षा

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सकाळपासून सुरूवात झाली आणि आता हळूहळू काही मतदारसंघातील चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात झाली. माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. माहिममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. वडिलांच्या शिक्षा चुकीची मुलाला  मिळाल्याचे चित्र आहे. 

मुंबईतल्या माहिम मतदारसंघात महायुतीकडून सदा सरवणकर उमेदवार होते. महाविकास आघाडीतून महेश सावंत रिंगणात होते. तर मनसे पक्षाकडून अमित ठाकरे उमेदवार होते. विधानसभेची निवडणुक जाहीर झाल्यापासून माहिम मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. माहिममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. मनसेकडून राज ठाकरेंच्या मुलाला म्हणजेच अमित ठाकरेंना उमेदवारी दिली होती. त्यामुळे महायुतीने उमेदवार न देता मनसेला पाठिंबा द्यावा अशी राज ठाकरेंची इच्छा होती. मात्र कार्यकर्ते नाराज होतील. त्यामुळे कार्यकर्त्यांना नाराज करू शकत नाही. म्हणत शिंदेंनी सिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. शिंदेंच्या शिवसेनेच्या विरूद्ध ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. याच फलित ठाकरे गटाला मिळाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत विजयी झाले.   


सम्बन्धित सामग्री