Saturday, January 18, 2025 07:30:17 AM

Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांग्लदेशी सरकारला आवाहन

हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा आणि हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हंगामी सरकारला केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांग्लदेशी सरकारला आवाहन

नवी दिल्ली : हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा आणि हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हंगामी सरकारला केले आहे. बांगलादेशातील चटगाव येथे झालेल्या हिंसाचारादरम्यान वकिलाच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे. सरकारी वकील सैफुल इस्लाम यांच्या हत्येप्रकरणी 46 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अनुयायांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान सैफुल इस्लाम यांची हत्या करण्यात आली होती.

 

बांग्लादेशात अलपसंख्यांकावर होत असलेले हलले,लूट आणि अत्याचारांच्या घटना चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा निषेध व्यक्त केला आहे. स्वरक्षणासाठी न्याय मागणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते कृष्णादास यांना अटक करून तुरूंगात टाकणे अन्यायकारक असल्याचे संघाकडून म्हटले आहे.

ढाका येथील विमानतळावर कृष्णादास यांना अटक करण्यात आली. या घटनेत भारतासह जागतिक समुदाय तसेच संस्थांनी पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे असे म्हणत समुदायाला पाठबळ देण्याचे आवाहन संघाकडून करण्यात आले आहे.  

 

काय आहे संघाची मागणी ?

बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व उदयास येत असल्याचे दिसते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दडपला जाऊ शकतो. हिंदूंचे आंदोलन शांततापूर्ण आहे. आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबणे अन्यायकारक आहे. चिन्मय कृष्ण दास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी.   


सम्बन्धित सामग्री