सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान, इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज आणि बोरगाव या पाच गावांतील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी पथदर्शी भूमिगत चर योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. कामासाठी सुमारे 93 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र शेतकर्यांच्या हिश्श्याची 20 टक्के रक्कम भरण्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे, तसा निर्णय शासनाने घेतला आहे.