Thursday, September 12, 2024 11:06:59 AM

Eknath Shinde
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १९५० कामांना मंजुरी

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २७६६ कोटींच्या १९५० विविध कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली.

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १९५० कामांना मंजुरी

मुंबई : नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २७६६ कोटींच्या १९५० विविध कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्राशी जोडले जाईल.  प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे देखील अद्ययावतीकरण केले जाईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य भुस्खलन व्यवस्थापन आराखडा, ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन आराखडा, महाराष्ट्र राज्य उष्मलाट कृती आराखडा या आपत्ती विषयक आराखड्यांना तसेच पालघर-वसई भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामालाही मंजुरी देण्यात आली. 


सम्बन्धित सामग्री