Thursday, May 22, 2025 06:03:34 PM

Arrest Warrant Against Sheikh Hasina: शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांवर विचार केल्यानंतर ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी हा आदेश दिला.

arrest warrant against sheikh hasina शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Arrest Warrant Against Sheikh Hasina
Edited Image

Arrest Warrant Against Sheikh Hasina: बांगलादेशच्या एका न्यायालयाने रविवारी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, त्यांची बहीण शेख रेहाना, ब्रिटिश खासदार ट्यूलिप रिझवाना सिद्दीक आणि इतर 50 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांवर विचार केल्यानंतर ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी हा आदेश दिला. त्यांच्यावर राजकीय सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे जमीन संपादित केल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा -  शेख हसीना यांच्या सरकारने बांगलादेशात 1400 लोकांची हत्या केली - यूएनचा दावा

दरम्यान, अटक आदेशांच्या अंमलबजावणीच्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी न्यायाधीशांनी 27 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयीन सूत्रांचा हवाला देत, बंगाली वृत्तपत्राने वृत्त दिले की, भूखंड वाटपातील भ्रष्टाचाराच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एसीसीने अलीकडेच 53 जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. शेख हसीना यांच्यासह सर्व 53 आरोपी फरार असल्याने, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.   

शेख हसीना यांच्या मुलीसह अटक वॉरंट जारी - 

प्राप्त माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी, याच न्यायालयाने राजुक भूखंड वाटपाशी संबंधित एका वेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात हसीना, त्यांची मुलगी सायमा वाजेद आणि इतर 17 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, 2013 मध्ये ढाक्यातील शापला चत्तर येथे झालेल्या कथित सामूहिक हत्येप्रकरणी बांगलादेशच्या एका न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि माजी पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) बेनझीर अहमद यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. 

हेही वाचा -  शेख हसीना यांच्या भाषणादरम्यान बांगलादेशात उफाळला हिंसाचार; निदर्शकांनी जाळले शेख मुजीबुर रहमान यांचे घर

बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांना 5 ऑगस्ट रोजी अपमानास्पद पद्धतीने देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. 


सम्बन्धित सामग्री